S M L

दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2015 02:12 PM IST

दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल

digha_ncp31 ऑक्टोबर : नवीमुंबईतील दिघा अनधिकृत इमारती बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नविन गवते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिपा गवते यांचे पती राजेश गवते यांच्यावर रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

स्थानिक रहिवासी ब्रिजेश मिश्रा यांनी तक्रार दाखल केल्या नंतर शुक्रवारी राञी दोन वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नविन आणि राजेश हे दोघे ही बंधू आहेत.

या दोघांची ही या अनधिकृत इमारती उभारण्यात महत्वाची भूमिका आहे. या गवते बंधूच्या अटकेनंतर आता 94 अनधिकृत इमारताच्या बांधकाम प्रकरणाला आता वेगळ वळण लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2015 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close