S M L

मिस्त्रमध्ये रशियन विमान कोसळलं, 224 प्रवाशी ठार

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2015 12:14 AM IST

मिस्त्रमध्ये रशियन विमान कोसळलं, 224 प्रवाशी ठार

31 ऑक्टोबर :मिस्त्रमध्ये रशियन विमान कोसळल्याची दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत 224 प्रवाशांचा मृत्यू झालाय.  या विमानाने शर्म अल शेख येथून रशियाला उड्डाण घेतलं होतं. सुरुवातील हे विमान बेपत्ता झाल्याचं वृत्त होतं. परंतु, इजिप्तच्या पंतप्रधानांनी विमान कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिलाय.

रशियासाठी उड्डाण घेतल्यानंतर या विमानचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. इजिप्तचे पंतप्रधान शरीफ इस्माईल यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की, रशियन विमान मिस्त्रमधील सिनाई द्वीपजवळ दुर्घटनाग्रस्त झालं. नागरी उड्डाण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक रशियन चार्टर्ड विमान होतं. विमानात 224 प्रवाशी आणि क्रुर मेंबरचे सात कर्मचारी होते. इंजिन फेल झाल्यानं या विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. 31 हजार फूट उंची वर गेल्यानंतर इजिप्तच्या हवाई नियंत्रण कक्षाशी या विमानाचा संपर्क तुटल्याचं सांगण्यात येतेय. सुरक्षा दलाने घटनास्थळाचा ताबा घेतलाय. पंतप्रधान इस्माईल यांनी तातडीने आपत्ताकलीन समिती स्थापन केली असून बैठक बोलावली आहे. समितीच्या चौकशीनंतर या दुर्घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2015 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close