S M L

आखाडा पालिकेचा‬ : मतदान संपलं, आता प्रतीक्षा निकालाची

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2015 08:47 PM IST

आखाडा पालिकेचा‬ : मतदान संपलं, आता प्रतीक्षा निकालाची

 50831214

01 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या कल्याण- डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठीची मतदान प्रक्रिया आज (रविवारी) संध्याकाळी साडे पाच वाजता संपली. कल्याण डोंबिवलीत सुमारे 47 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरकरांनी मतदानाला भरभरुन प्रतिसाद दिला असून कोल्हापूरात सुमारे 72 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेले शाब्दिक युद्ध, राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचे दाखले देत घेतलेल्या प्रचार सभा, हाणामारी अशा विविध कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक रंगली होती. तर कोल्हापूरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा - ताराराणीची युती यांच्यातील चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंग भरला होता. दोन्ही महापालिकांमध्ये सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये मतदानाला सुरुवात झाली. डोंबिवलीतील पाथर्ली इथे भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारीच्या घटनेने काही काळ तणाव होता.

कल्याण डोंबिवलीतील 122 जागांसाठी 750 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम बंद झालं आहे. पण एकंदरीत कल्याण डोंबिवलीकरांमध्ये मतदानासाठी फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याने नाव शोधताना मतदारांची तारांबळ उडत होती. शहरी भागात उत्साह नसला तरी डोंबिवली ग्रामीणमधील 27 गावांमध्ये मतदानाचा उत्साह होता. भालगावातील ग्रामस्थांनी मात्र मतदानावर बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला.

तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून यंदा सुमारे 72 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. 81 जागांसाठी 506 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. कोल्हापूरमध्ये सदर बाजारमध्ये ताराराणीचे उमेदवार आणि मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांमध्ये वाद झाला होता. उमदेवाराचे प्रतिनिधी येण्यापूर्वीच मतदान यंत्र सुरू केल्याने हा वाद झाला होता.

दरम्यान, कोल्हापूरमधील बड्या नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी महापालिकेत आमचाच महापौर बसेल असं सांगत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तर कोल्हापूरमध्ये भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजप - शिवसेना युतीत वाद असले तरी भाजप शिवसेनेला सोबतीला घेणार असेही त्यांनी नमूद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2015 07:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close