S M L

कोल्हापुरात काँग्रेसचा 'हात' उंचावला, भाजप-सेनेला धोबीपछाड

Sachin Salve | Updated On: Nov 2, 2015 02:09 PM IST

कोल्हापुरात काँग्रेसचा 'हात' उंचावला, भाजप-सेनेला धोबीपछाड

02 नोव्हेंबर : विधानसभेत सपाटून पराभवानंतर काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणुकीत कमबॅक केलंय. पालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 27 जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आपला गड राखत काँग्रेसला मोठं यश मिळवून दिलंय. काँग्रेसने आपला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यासाठी अनुकूल असल्याचे संकेतही दिले आहे. राष्ट्रवादीने मात्र अजून आपला निर्णय जाहीर केला नाही. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी सत्ता स्थापण्यासाठी एकमत होण्याची चिन्ह आहे.

राष्ट्रवादीने 15 जागा पटकावल्या तर काँग्रेसने 27 जागा जिंकल्यात. जर आघाडी झाली तर बहुमताचा 41चा आकडा गाठला जाणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना, भाजपला कोल्हापूरकरांनी नापसंती दर्शवत चांगलाच कोल्हापुरी हिसका दिलाय. शिवसेनेला 4 जागा तर भाजपला 12 जागांवर समाधान मानावं लागलंय. ताराराणी पक्षाने 20 जागा जिंकत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरलाय.

(सविस्तर बातमी लवकरच)

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2015 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close