S M L

मुंबईतल्या काही पोलिसांचे दाऊदशी लागेबांधे - छोटा राजन

Samruddha Bhambure | Updated On: Nov 3, 2015 09:52 AM IST

मुंबईतल्या काही पोलिसांचे दाऊदशी लागेबांधे - छोटा राजन

03 नोव्हेंबर : मुंबई पोलिसातील काही जण दाऊदला सामील असून मला संपवण्याचा कट रचला जात आहे, असा खळबळजनक आरोप गँगस्टर छोटा राजनने केला आहे. मुंबईत काही लोक, काही पोलिस दाऊदसोबत काम करत आहेत, असं राजन म्हणाला. मी दाऊदला घाबरत नाही. मी आयुष्यभर दहशतवाद आणि दाऊदशी लढलो आहे. त्यामुळे सरकारनं मला न्याय द्यावा, अशी अपेक्षीही छोटा राजनने व्यक्त केली आहे.

इंडोनेशियातील बालीमध्ये अटक झाल्यानंतर छोटा राजनला भारतात आणण्याच्या हालचालींना आता वेग अला असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी सीबीआय आणि मुंबई पोलिसांची एक टीम बालीमध्ये दाखल झाले आहेत. येत्या एक-दोन दिवसात त्याला भारतात आणण्यात येईल. पण त्याआधी राजनने केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, छोटा राजनला पहिले दिल्लीत आणणार, तिथे सीबीआय त्याची चौकशी करणार आणि त्यानंतर राजनला मुंबईत आणण्यात येणार आहे. छोटा राजनला कशा प्रकारे आणलं जाणार याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. त्याला एका विशेष विमानानं भारतात आण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआयच्या पथकानं काल बालीमधल्या तुरुंगात छोटा राजनची भेट घेतली. राजनला भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईत आणलं जाणार आहे. मुंबईत आल्यावर गुप्तचर संघटना त्याची चौकशी करतील असं सांगण्यात आलं आहे. मात्र, त्यासाठी हस्तांतरणाच्या कायद्याचा वापर होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. दोन्ही देशांदरम्यान यासाठी पत्रव्यवहार करण्याची गरज नाही असं इंडोनेशियानं भारताला कळवलं आहे.

छोटा राजनच्या अटकेनंतर कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कराची आणि इस्लामाबादमध्ये दाऊदची मोठमोठी घरं आहेत. त्या घरांबाहेरच्या सुरक्षेत चांगलीच वाढ करण्यात आली आहेत. दाऊदसाठी आता पाकिस्तानी लष्करातले विशेष कमांडो तैनात करण्यात आले आहेत, अशी सूत्रांनी IBN नेटवर्कला माहिती दिली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दाऊलदा पाकमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर?, ही भीती कुठे ना कुठे पाक सरकारच्या मनात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2015 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close