S M L

भाजपची रणनीती, 52 चा आकडा गाठून सेनेशी बरोबरीने करणार चर्चा ?

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2015 10:47 PM IST

danve on sena3403 नोव्हेंबर : कल्याण आणि डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपदाच्या राजकारणाला सुरुवात झाली. .भाजपला शिवसेनेपेक्षा 10 जागा कमी मिळाल्यात. मात्र, महापौरपद मिळवण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा कायम आहे.

त्यामुळे भाजपचे 42, भाजप पुरस्कृत 1 आणि इतर 9 नगरसेवक अशी 52 नगरसेवकांची मोट बांधून शिवसेनेशी बरोबरीनं चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे भाजपला अडीच वर्ष महापौरपद मिळवणं शक्य होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहे असं स्पष्ट केलंय.

तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि आमदारांचीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेना भवनात बैठक झाली. पण त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली नाही. उलट भाजपला आमच्यासोबत यायचं नाही, हे आता स्पष्ट झालंय, अशी प्रतिक्रियाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर दिलीये. आमचा मार्ग आम्ही निवडणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे सेना आणि भाजपमधील संबंध आणखी सुधारता की शिवसेना मनसेला टाळी देते हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2015 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close