S M L

सेल्फीमुळे 14 वर्षांच्या मुलाने गमावला जीव

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2015 02:26 PM IST

सेल्फीमुळे 14  वर्षांच्या मुलाने गमावला जीव

04 नोव्हेंबर : नाहूर कांजूर परिसरातील रेल्वे यार्डात खेळत असताना सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एका 14 वर्षांच्या मुलाचा ओव्हर हेड वायरचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव साहिल इसवलकर असं आहे.

9 वीमध्ये शिकणारा साहिल शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर त्याच्या मित्रासोबत नाहूर स्टेशनजवळ असलेल्या रेल्वे सिमेंट यार्ड परिसरात खेळायला गेला होता. त्यावेळी तो त्याठिकाणी उभ्या असलेल्या माल गाडीवर चढला आणि स्वतःच्या कॅमर्‍यातून फोटो काढू लागला. त्यावेळी त्याचा संपर्क ओव्हर हेड वायरशी आल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी जवळपास असलेल्या परिसारात जाऊन मदत मागवली आणि त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याधीही देखील कांजूरमध्ये खेळता खेळता एका अल्पवयीन मुलाचा साडीचा फास लागून मृत्यू झाला होता. महिनाभरतील ही दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2015 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close