S M L

'शंभर कार्यकर्तेही जमवता आले नाहीत'

5 फेब्रुवारीशिवसेनेत आता ताकद उरली नाही.. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यासाठी साधे 100 कार्यकर्तेही जमा करता आले नाहीत... हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचे अपयश आहे...अशी खिल्ली महसूलमंत्री नारायण राणे यांनी आज उडवली. शिवसेनेचे राहुल गांधी यांच्या विरोधातले आंदोलन फसले, असे राणे म्हणाले आहेत. मुंबईतील कायदा-सुव्यवस्था उत्तम असल्यानेच राहुल गांधी यांचा दौरा अत्यंत यशस्वी झाल्याचा दावाही त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला. राहु गांधींनी अगदी सहजपणे लोकल ट्रेनधून प्रवास केला, याचाच अर्थ मुंबईत कायदा व सुव्यवस्था चोख आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे हे आंदोलन फसल्याने शिवसेनेत आता दम राहिलेला नाही. सेनेची आज फजिती झाली आहे. उद्धव ठाकरेंनी आता दुकान बंद करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. कालही पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी शिवसेना नेतृत्वावर प्रखर टीका केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2010 10:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2010 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close