S M L

सीमा परिषदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न

5 फेब्रुवारीबेळगाव इथे सुरु असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा परिषदेत काही कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या कार्यर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करत त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे.बेळगावमध्ये सीमा परिषदेला सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वच पक्षांचे नेते उपस्थित आहेत.कालही कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याची प्रयत्न केला होता. एका कार्यकर्तीने तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सीमाबांधवांच्या या परिषदेला परवानगी देण्यास कर्नाटक सरकारने शेवटपर्यंत टाळाटाळ केली होती. कर्नाटक सरकारने बेळगावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. शीघ्र कृती दलाने पथसंचलनही केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2010 11:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2010 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close