S M L

केडीएमसी पालिकेच्या महापौरपदासाठी 11 नोव्हेंबरला निवडणूक

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2015 09:55 PM IST

135431-kdmc04 नोव्हेंबर : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आता महापौरपदासाठी 11 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत भाजपने सेनेसोबत सत्ता स्थापण्याची तयारी दाखवलीय खरी पण त्यांना इथं औरंगाबाद पॅटर्न हवाय. म्हणजेच चार वर्ष शिवसेनेचा महापौर तर एक वर्ष भाजपचा महापौर असावा, अशी भाजपची अट आहे.

तसंच स्थायी समितीचं अध्यक्षपद तीन वर्ष शिवसेनेकडे तर दोन वर्ष भाजपकडे असावं. असा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवल्याचं कळतंय. मंगळवारी रात्री भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बैठक झाली. त्यात हा सत्तेचा हा फॉर्म्युला मांडला गेला. भाजपच्या या प्रस्तावाला सेनेकडून मात्र, अजून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2015 09:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close