S M L

विनयभंगाच्या धक्क्यातून 'ती'ने अन्नपाणी सोडलं आणि दुर्दैवाने...

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2015 10:17 PM IST

rape sds04 नोव्हेंबर : बारामती शहरातील कसबा परिसरात एका मुलीचा विनयभंग झाला होता या घटनेनं या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता यातून तिने अन्न पाण्याचा त्याग केला होता. आज शेवटी तिचा दुदैर्वी मृत्यू झाला.

शहरातील कसबा परिसरात एका गतिमंद मुलीवर दत्ता खरात नावाच्या नराधामाने घरात घुसुन बलात्कार करन्याचा प्रयत्न केला. भर चौकात घर असल्याने हा प्रकार सर्वत्र पसरला आनि मुलीला हा धक्का सहन झाला नाही आणि त्यातून 24 तारखेपासून म्हणजे घटना घडल्यापासून अन्नपाण्याचा त्याग केला तो आज अंतिम श्वास घेईपर्यंत. आज दुपारी 5 च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची बातमी आय .बी.एन.लोकमत ने दाखवल्या नंतर पोलिसांनी या आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2015 10:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close