S M L

छोटा राजनला उद्या पहाटे आणणार भारतात, सर्व खटले सीबीआयकडे !

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2015 07:48 AM IST

छोटा राजनला उद्या पहाटे आणणार भारतात, सर्व खटले सीबीआयकडे !

05 नोव्हेंबर : गँगस्टर छोटा राजन प्रकरणातले खटले आता सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहेत. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर घेण्यात आलाय असं अतिरिक्त मुख्य सचिव के पी बक्षी यांनी आज (गुरुवारी) संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं. निर्णय घेतल्यानंतर तासाभरातच त्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली. छोेटा राजन आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात येण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाली एअरपोर्ट बंद होतं. नुकतंच ते खुलं झालं. त्यामुळे छोटा राजनचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी भारतीय दूतावास प्रयत्न करतंय. सीबीआयची टीम गेल्या दोन दिवसांपासून इंडोनेशियात आहे. छोटा राजनला दिल्लीत आणलं जाणार आहे. तिथं त्याची चौकशी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2015 10:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close