S M L

इजिप्तमध्ये 'ते' रशियन विमान बॉम्बस्फोट घडवून पाडलं ?

Sachin Salve | Updated On: Nov 5, 2015 05:55 PM IST

इजिप्तमध्ये 'ते' रशियन विमान बॉम्बस्फोट घडवून पाडलं ?

05 नोव्हेंबर : इजिप्तमध्ये कोसळलेलं रशियाचं विमान बॉम्बस्फोट घडवून पाडलं असावं, असा दावा अमेरिका आणि ब्रिटनने केला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि ब्रिटनने हा दावा केलाय. पण, अजून याबद्दलचा अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

रशियाच्या या विमानाला इजिप्तमधल्या शर्म अल शेखहून उड्डाण केल्यानंतर अपघात झाला होता. यात 224 प्रवाशांचा मृत्यू ओढवलाय. हे विमान आम्ही पाडलं, असा दावा आयसिसने केला होता. पण इजिप्तच्या सरकारने आयसिसचा हा दावा फेटाळून लावलाय. या विमानामधल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं या अपघातात नुकसान झालंय. पण फ्लाईट डाटा रेकॉर्डरवरून हा अपघात नेमका कसा झाला ते कळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2015 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close