S M L

आज आणखी 24 निर्माते-दिग्दर्शकांकडून 'पुरस्कारवापसी'

Sachin Salve | Updated On: Nov 5, 2015 10:46 PM IST

आज आणखी 24 निर्माते-दिग्दर्शकांकडून 'पुरस्कारवापसी'

05 नोव्हेंबर : देशातल्या असहिष्णूतेचा विरोध करण्यासाठी मिळालेले पुरस्कार परत करणार्‍यांमध्ये आज आणखी 24 चित्रपट निर्माते -दिग्दर्शक यांचा समावेश झाला. कुंदन शहा, सईद मिर्झा अशा दिग्गज फिल्ममेकर्सनी त्यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार परत केले.

मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी यासंबंधीची घोषणा केली. आमच्या या प्रतिकात्मक कृतींनंतर तरी आम्हाला वाटणार्‍या भीतीकडे लक्ष दिले जाईल असं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

याधीही देशभरातील साहित्यिक -लेखकांनी आपले पुरस्कार परत केले आहे. मात्र, दादरी प्रकरणी,कलबुर्गी हत्या प्रकरणाचा केंद्राशी संबंध नाही. साहित्यिकांनी पुरस्कार परत करू नये असं आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आलं होतं. एवढंच नाहीतर राजनाथ सिंह यांनी चर्चेसाठी आवाहनही केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2015 09:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close