S M L

बारामतीत पुन्हा भाजप-राष्ट्रवादीच्या प्रेमाचं 'प्रदर्शन'

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2015 05:01 PM IST

बारामतीत पुन्हा भाजप-राष्ट्रवादीच्या प्रेमाचं 'प्रदर्शन'

06 नोव्हेंबर : भाजप आणि राष्ट्रवादीचं प्रेम पुन्हा एकदा फुलून आलंय. यावेळी निमित्त होतं ते कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचं. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री तर नव्हते पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे,गिरीष बापट आदी मंडळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाहुणे होते. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय आणि प्रेमळं नात्यावर चर्चा सुरू झालीये.

बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंय. या कार्यक्रमाला शरद पवार कुटुंबीयही उपस्थित होते. विशेष म्हणजे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीला दिलेल्या भेटी चर्चेत राहिल्या होत्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री एकनाथ खडसे, अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री गिरीष बापट बारामतीत होते. यावेळी खुद्द शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर दिसले.

एवढंच नाहीतर एकाच कारमधून कृषीप्रदर्शनाची सफरही केली. या कार्यक्रमात पवारांनी मराठवाड्याचं पाणी, डाळ आणि ऊस या सर्वांवरच आपली भूमिका स्पष्ट केली. एकाच राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्हात पाणी जात असेल तर त्याला विरोध होता कामा नये. निदान माणुसकीच्या नात्याने तरी विरोध होऊ नये असं मत पवारांनी मांडलं. दरम्यान, भाजपचं साबरमती ते बारामती हे कनेक्शन वारंवार शिवसेनेला दाखवण्यासाठी घडवून आणलं जातंय का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2015 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close