S M L

भर दिवसा ज्वेलर्सवर दरोडा

7 फेब्रुवारीऔरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर परिसरात असणार्‍या बोरा ज्वेलर्सवर भर दुपारी दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात दुकानाचा मालक जखमी झाला आहे. दरोडेखोरांना दीड किलो वजनाचे 10 लाखांचे सोने-चांदीचे दागिने लांबवले आहेत. रोख 20 हजार रुपयेही त्यांनी लुटले आहेत. विशेष म्हणजे हा दरोडा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्ड झाला आहे. दरोडेखोरांकडे अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर होते. तोंडावर कपडा न बांधता दरोडेखोर आले होते. त्यामुळे सीसीटीव्हीतील फुटेजमधून त्यांची ओळख पटेल. आणि आम्ही या दरोडेखोरांना ताबडतोब पकडू, अशा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2010 12:38 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2010 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close