S M L

बारामती : सह्याद्री फार्ममधल्या गायींना शिवसेनेना देणार 400 किलो चारा

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2015 03:15 PM IST

बारामती : सह्याद्री फार्ममधल्या गायींना शिवसेनेना देणार 400 किलो चारा

baramati_gai_sena07 नोव्हेंबर : खरंतर आज वसुबारस...आजच्या दिवशी सर्वत्र गायींची पूजाअर्जा करून त्यांना नैवेद्य दिला जातो...पण पवारांच्या बारामतीत मात्र, गायींची उपासमार होतेय. या गायींची व्यथा आयबीएन लोकमतने मांडली. ही व्यथा पाहून शिवसेनेन पुढाकार घेत बारामतीला 400 किलो चारा पाठवणार आहे. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी हा निर्णय घेतलाय.

बारामतीत शरद पवार यांनी सुरू केलेल्या सह्याद्री काऊ फार्ममधल्या 1500 गायी अक्षरशः वार्‍यावर आहेत. प्रमोद गोएंका यांच्या डायनॅमिक्स डेअरीचं हे फार्म आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून या गायींकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातंय.

शेतकर्‍यांना चार्‍याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे गायींचा चार्‍याचा पुरवठा बंद झालाय. त्यांना गेल्या 15 दिवसांपासून चारा पाणी मिळत नाहीये. इतकंच नाही तर वैद्यकीय उपचारही मिळत नाहीत. सध्या गाई अत्यंत खंगलेल्या अवस्थेत फिरत आहेत, खायला काही नसल्यामुळे उपचार नसल्यामुळे रोज 4 ते 5 गाई मरत असल्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी खासगीत मान्य केलं. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांच्या पुढाकारानं हे फार्म सुरू करण्यात आलं होतं. आयबीएन लोकमतने याबद्दलचे वृत्त दाखवल्यानंतर शिवसेनेनं आता पुढाकार घेत 400 किलो चारा पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2015 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close