S M L

सत्तेच्या नावानं चांगभलं, केडीएमसीत सेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब ?

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2015 03:39 PM IST

सत्तेच्या नावानं चांगभलं, केडीएमसीत सेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब ?

07 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेना आणि भाजपमधली चर्चा आता संपली आहे. भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेनेसमोर औरंगाबाद पॅटर्नचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. 4 वर्ष सेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीपद 3 वर्ष भाजप आणि 2 वर्ष सेना असा प्रस्ताव मांडण्यात आलाय. पण, शिवसेनेनं अजून यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. पण, प्रचारात हमरीतुमरीवर आलेले दोन्ही पक्ष मात्र सत्तेसाठी वाटाघाटीवर येऊन ठेपले आहे.

कल्याण डोंबिवलीच्या आखाड्यात भाजप आणि शिवसेना असा सामना रंगला होता. सेनेनं तर सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. एवढंच नाहीतर सेना -भाजपमधला राडा आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला. पण, निकालाअंती शिवसेनाच मोठा भाऊ ठरला. तर भाजपला लहाना भाऊ. सेनेनं 52 जागा जिंकल्यात आणि भाजपने 42 जागा पटकावल्यात. पण बहुमताने हुलकावणी दिल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या तयारी करत आहे. कल्याण- डोबिंवली महापालिका सत्ता स्थापनेची चर्चा संपली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये ही चर्चा झाली. औरंगाबाद पॅटर्नच्या धर्तीवर केडीएमसीमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे बैठकीनंतर 'मातोश्री'ला रवाना झालेत, ते उद्धव ठाकरे यांना या बैठकीची माहिती देणार आहेत. तर सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंबधीची माहिती कळवली आहे. सत्ता स्थापनेबाबत अंतिम घोषणा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे करण्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2015 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close