S M L

पुरस्कारवापसी विरोधात अनुपम खेर रस्त्यावर, राष्ट्रपती भवनावर काढला मोर्चा

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2015 04:08 PM IST

पुरस्कारवापसी विरोधात अनुपम खेर रस्त्यावर, राष्ट्रपती भवनावर काढला मोर्चा

kher march for india07 नोव्हेंबर : पुरस्कारवापसी विरोधात अभिनेते अनुपम खेर आज रस्त्यावर उतरले. खेर यांनी नवी दिल्लीत इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन असा हा राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला होता.

पुरस्कार परत करण्यार्‍या साहित्यिक, लेखक आणि दिग्दर्शकांच्या विरोधात 'मार्च फॉर इंडिया' असं नाव या मोर्चाला देण्यात आलं होतं. अनुपम खेर यांनी  या मोर्चाचं नेतृत्व केलं.  यात अनेक कलाकारही सहभागी झाले होते.

गेले अनेक दिवस खेर पुरस्कार परत करण्याच्या विरोधात बोलतायत. अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचीही वेळ मागितली आहे. या मोर्चात अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या देखील सहभागी झाल्या असून त्या भाजपच्याच खासदारही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2015 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close