S M L

...तर साखर कारखाने बंद पाडू, राजू शेट्टींचा इशारा

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2015 04:11 PM IST

raju shetty4307 नोव्हेंबर : ऊस उत्पादकांना येत्या 6 डिसेंबरपर्यंत एफआरपीप्रमाणे भाव मिळाली नाही तर कारखाने बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 14 वी ऊस परिषद झाली. त्यावेळी हा इशारा शेट्टी यांनी दिलाय.

विनाकपात एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये. त्यामुळे कारखानदार आणि सरकारला एक महिन्याची मुदत देत निर्वाणीचा इशारा शेट्टी यांनी दिलाय.

एफआरपी न देणार्‍या कारखानदारांना तुरुंगात टाकण्याची मागणी करण्यात आली. यासाठी सरकारने दंडुक्याचा वापर करणं गरजेचं असल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केलं. या ऊस परिषदेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर होणारी ही पहिलीच ऊस परिषद होती. त्यामुळे शेट्टी आंदोलनाच्या बाबतीत काय भूमिका घेतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. तर एफआरपीसाठी चर्चेला तयार असल्याची भूमिका शेट्टी यांनी घेतलीय तसंच विश्वास घात केला तर एकाही मंत्र्यांला फिरू देणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2015 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close