S M L

विराट सेनेकडून दिवाळी भेट, द.आफ्रिकेवर 108 रन्सनी विजय

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2015 05:24 PM IST

विराट सेनेकडून दिवाळी भेट, द.आफ्रिकेवर 108 रन्सनी विजय

07 नोव्हेंबर : वनडे मालिकेत पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकेत पहिला विजय नोंदवत विराट सेनेनं दिवाळीची भेट दिलीये. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 108 रन्सनी शानदार विजय मिळवलाय. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची आक्रमक बॅटिंग आणि याच जोडच्या भेदक मार्‍यापुढे अफ्रिकनं संघ 109 रन्सवर गारद झाला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीये.

मोहाली कसोटीत भारताची दुसरी इनिंग 200 रन्सवर आटोपल्यानंतर दक्षिण अफ्रिकेसमोर 218 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. 218 धावांचा पाठलाग करणारा आफ्रिकनं संघ सपेशल अपयशी ठरला. आर. आश्विनच्या शानदार इनिंग पेश करत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर ऑल राऊंडर भूमिका बजावणार्‍या जडेजाने 3 विकेट घेतल्यात. या बळावर आफ्रिकनं संघ 109 वर ऑलआऊट झाला. याआधी भारताने दुसर्‍या इनिंगमध्ये 125 रन्सवर खेळाला सुरुवात केली. पण, 200 रन्सवर टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला.चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने चांगली सुरुवात केली खरी पण 29 रन्सवर कोहली आऊट झाला. तर पुजारा त्यानंतर 77 रन्सवर आऊट आला. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया 201 रन्सवर ऑलआऊट झाली. याला प्रत्युत्तर देत आफ्रिकनं टीमची चांगलीच दमछाक झाली. आफ्रिकनं टीम 184 रन्सवर गारद झाली. भारताने 17 धावांची आघाडी घेत दुसर्‍या इनिंगला सुरुवात केली. पण, टीम इंडिया 200 धावांपर्यंत मजल मारू शकली. पण, इथंही आफ्रिकनं टीमला सावरता आला नाही. संपूर्ण टीम 109 रन्सवर ऑलआऊट झाली. वनडेत झालेल्या पराभवाची परतफेड करत टीम इंडियाने विजयाची दिवाळी भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2015 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close