S M L

मंदिरांपेक्षा शेतकर्‍यांकडे लक्ष द्या, आदित्य ठाकरेंचा खैरेंना टोला

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2015 08:46 PM IST

मंदिरांपेक्षा शेतकर्‍यांकडे लक्ष द्या, आदित्य ठाकरेंचा खैरेंना टोला

07 नोव्हेंबर : औरंगाबादमध्ये मंदीर पाडल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे खासदार चंद्रकांच खैरे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ केली होती. त्यामुळं खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणी आता शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही खैरे यांना चपराक लगावलीये. मंदिरांपेक्षा शेतकर्‍यांकडे लक्ष द्या असा टोला आदित्य यांनी लगावला.

औरंगाबादचे सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे या ना त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहता. चंद्रकांत खैरे यांनी गेल्या आठ दिवसांपासून मंदीर बचाव मोहीम सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिळ स्थळ पाडण्याची मोहीम जिल्हा प्रशासनानं सुरू केलीय. मात्र यामुळे खैरेंनी थेट तहसीलदारांनाच शिवीगाळ करण्याचा पराक्रम गाजवलाय. या प्रकरणी तर त्यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात स्थानिक सेनेचे नेते आणि कार्यकर्ते खैरेंच्या पाठीशी उभे राहिले नाही. अशातच खुद्द सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनाही खैरेंचा हा पराक्रम रुचला नाही. शेतकर्‍यांची घरं आमच्यासाठी मंदिर आहेत. ती आम्हाला वाचवली पाहिजे अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली. आदित्य ठाकरेंनी खैरेंचा उल्लेख जरी टाळला खरा पण रोख मात्र त्यांच्याकडेच होता.

चंद्रकांत खैरै को गुस्सा क्यूँ आता है ?

1-भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांना शिवीगाळ आणि मारहाण

2-शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवेंना शिवीगाळ आणि कानशिलात लगावली

3-माजी महापौर कला ओझांना शिवजयंतीच्या कार्यक्रमात रडवलं

4-पालिका आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्यावर आरडओरड

5-तत्कालीन पोलीस आयुक्तांवर गणपती विसर्जनात आरडाओरड

6-तत्कालीन पालिका आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्यावर समांतरच्या विषयावरून आरडाओरड

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2015 07:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close