S M L

...म्हणून लोकसभेत भाजप बाहुबली ठरला, सेनेनं भाजपला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2015 08:55 AM IST

...म्हणून लोकसभेत भाजप बाहुबली ठरला, सेनेनं भाजपला फटकारलं

10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या दारुण पराभवावर पुन्हा एकदा शिवसेनेनं तोंडसुख घेतलं. लोकसभा निवडणुकीत ताकदवान प्रतिस्पर्धी नव्हता म्हणून भाजप बाहुबली ठरला, असा टोला शिवसेनेनं आपल्या मुखपत्र 'सामना'तून लगावलाय.

भारतीय जनता पक्षाला आम्ही पाण्यात पाहण्याचे कारण नाही. आमच्याच खांद्यावर घेऊन आम्ही त्यांना महाराष्ट्रात मिरवले आहे. शेवटीशिवसेना ही शिवसेना आहे. सत्तेच्या प्राणवायूवर शिवसेनेचा जिवंतपणा टिकून नाही. विजयामुळे लालूंमध्ये अहंकार वाढेल असे भाजप नेत्यांनी सांगावे हे गमतीचेच आहे सदासर्वकाळ निवडणुका जिंकण्याचे तंत्र आणि जादू कुणाकडेच नाही. अनेकदा हवेची एक वावटळ येते व निघून जाते. कालांतराने त्या वावटळीचे नामोनिशाणही उरत नाही असा मार्मिक टोला शिवसेनेनं नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता लगावला.

तसंच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला हे सत्य, पण त्या विजयाचे श्रेय आजही (तेव्हाच्या) राहुल गांधी यांच्या कमकुवत आणि कुचकामी नेतृत्वास दिले जाते. आखाड्यात ताकदीचा चपळ पहेलवान नव्हता. त्यामुळे भाजप बाहुबली ठरला अशा कानपिचक्याही दिल्यात. तसंच शत्रुघ्न सिन्हा यांच्या विधानाचा उल्लेख करत मोदींवर शरसंधान साधण्यात आले. अस्सल बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांनी, पराभवाची जबाबदारी कुणाची ते निश्चित करा. 'ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को'.म्हणजे विजयाच्या टाळ्या संघनायकास मिळत असतील तर पराभवाच्या शिव्यासुद्धा संघनायकानेच स्वीकारल्या पाहिजेत. बिहारी बाबूचा रोख कुणावर ते सांगायला नको असंही नमूद करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2015 08:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close