S M L

यवतमाळमध्ये शेतकर्‍यांनी सरकारच्या निषेधार्थ लावले 288 दिवे

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2015 04:00 PM IST

Image img_236142_yavatmal3534_240x180.jpg13 नोव्हेंबर : संपूर्ण देशात फटाके फोडून दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यवतमाळ जिल्ह्यात नेर इथं शेतकर्‍यांनी विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयात दिवाळी साजरी केली. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध करत 288 दिवे शेतकर्‍यांनी लावले.

शेतकर्‍याच्या या आंदोलनाने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं. नापिकीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असतांना सरकारकडून मात्र ठोस अशी कुठलीही मदत दिली जात नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली . महाराष्ट्राच्या विधासभेत 288 आमदार जनतेने निवडून दिले. पण ते ही शेतकर्‍यांबद्दल आवाज उठवत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2015 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close