S M L

ढोबळे यांच्या जातीवरून वाद

5 फेब्रुवारीराज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या जातीवरुन सोलापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ढोबळे यांनी जातीचे 3 वेगवेगळे दाखले दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. ढोबले यांचे राजकीय प्रतिस्पर्धी माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ढोबळे यांच्याकडे होलार, हिंदू मांग आणिअनुसूचित जमाती असे 3 दाखले असल्याचा आरोप केला जात आहे. पण हे आपल्या विरुद्धचं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप ढोबळेंनी केला आहे. लक्ष्मण ढोबळे यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांची जात हिंदू मांग असल्याचे नमूद केले. त्यापूर्वी 1974मध्ये सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात प्रवेश घेताना त्यांनी स्वत:ची जात अनुसूचित जमाती अशी नोंदवली आहे. तर 1995मध्ये त्यांनी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातून होलार जातीचा दाखला काढल्याचे पुरावे माहितीच्या अधिकारात विरोधकांनी गोळा केले आहेत. पण विरोधकांनी 'मी हिंदू मांग नाहीत हे सिध्द करावे किंवा होलार आहोत हे सिध्द केल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ' असे आव्हान ढोबळेंनी दिले आहे. या आधीही या प्रकरणी औरंगाबाद कोर्टाने ढोबळेंच्या बाजूने निकाल दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2010 01:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2010 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close