S M L

आव्हान टेस्ट वाचवण्याचे

5 फेब्रुवारीनागपूर टेस्टमध्ये भारतीय टीम तिसर्‍या दिवस अखेरीस पराभवाच्या छायेत वावरत आहे. पहिल्या इनिंगमध्ये 325 रन्सनी पिछाडीवर पडल्यावर दुसर्‍या इनिंगमध्येही गंभीर आणि सेहवाग झटपट आऊट झालेत. त्यापूर्वी पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम 233 रन्सवर ऑलआऊट झाली. सेहवाग आणि नवख्या बदि्रनाथचा अपवाद वगळता इतर एकही बॅट्समन पिचवर टिकून राहू शकला नाही. सेहवागने आज टेस्टमधली आपली विसावी सेंच्युरी केली. तर बदि्रनाथने पदार्पणातच हाफ सेंच्युरी करण्याची किमया केली. पण दोघेही भारताचा फॉलोऑन टाळू शकले नाहीत. मिडल ऑर्डर झटपट आऊट झाली. आफ्रिकेतर्फे डेल स्टेनने 51 रन्समध्ये 7 विकेट घेतल्या. फॉलो ऑननंतर दुसर्‍या इनिंगमध्येही भारताची सुरुवात खराब झाली. दुसर्‍याच ओव्हरमध्ये गौतम गंभीर आऊट झाला. तर वीरेंद्र सेहवागही 16 रन्सवर आऊट झाला. सचिन तेंडुलकर आणि मुरली विजयने मग उरलेल्या 17 ओव्हर्स खेळून काढल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2010 02:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2010 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close