S M L

टिमविच्या विद्यार्थ्यांची फरफट

5 फेब्रुवारीपुण्यातल्या टिळक महाराष्ट्र या डीम्ड विद्यापीठाने इंजीनिअरिंगचा डिप्लोमा अभ्यासक्रम चालवला. पण हजारो रुपये फी भरुन...डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना धक्काच बसला. महाराष्ट्र सरकारच्या एकाही नोकरीमध्ये या विद्यार्थ्यांना घेतले जात नाही.आणि डिग्रीसाठी इतर विद्यापीठांमध्येही त्यांना प्रवेश नाकारले जात आहेत. कारण MSBT म्हणजेच महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण मंडळाचा इक्विव्हॅलन्स टिळक विद्यापीठाला मिळालेला नाही. राज्य सरकार आणि विद्यापीठाच्या या भांडणात नुकसान होत आहे ते मात्र विद्यार्थ्यांचे.5 एप्रिल 2006 च्या एका परिपत्रकानुसार डीम्ड विद्यापीठांना टेक्निकल कोर्स सुरु करताना कुणाच्याही मान्यतेची गरज नाही, असे युजीसीने स्पष्ट केले आहे. पण राज्यात MSBT च्या मान्यतेशिवायच्या कुठल्याच कोर्सला सरकारी नोकरीसाठी मान्यताप्राप्त मानले जात नाही.टिळक विद्यापीठाने 10 जुलै 2008 ला MSBT कडे इक्विव्हॅलन्ससाठी केलेला अर्ज अद्याप पडून आहे.टिळक विद्यापीठाच्या राज्यभरात 50 हून अधिक शाखा आहेत. तेथील शेकडो विद्यार्थ्यांना सध्या हा प्रश्न सतावत आहे. केंद्राच्या मान्यतेनेच सुरु झालेल्या टिळक डीम्ड विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या या भांडणात विद्यार्थ्यांची मात्र चांगलीच फरफट होत आहे. टिळक विद्यापीठाने इंजीनिअरिंगचे कोर्स या वर्षापासून बंद केले आहेत. पण गेले 3 वर्ष हे कोर्स सुरु होते. त्यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याचे काय? हा खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2010 02:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close