S M L

इसिसने स्वीकारली पॅरिस हल्ल्याची जबाबदारी

Samruddha Bhambure | Updated On: Nov 14, 2015 08:01 PM IST

इसिसने स्वीकारली पॅरिस हल्ल्याची जबाबदारी

14 नोव्हेंबर : पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा पॅरिसमध्ये सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यात 153 नागरिकांचा बळी गेला, तर 200हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

फ्रान्स सरकारने सीरियामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा इसिसने केला आहे. त्याचबरोबर इस्लामिक स्टेटने या हल्ल्याचे जाहीर कौतुक केलं असून त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्लामिक राष्ट्राच्या निर्मितीसाठी इसिसने इराक आणि सीरियात जिहाद पुकारला असून, आपल्या दहशतवादी कारवायांनी या दोन्ही देशांतील बर्‍याचशा प्रदेशावर ताबा मिळवला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी फ्रान्सने सीरियाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच इसिसने पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला असल्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, अध्यक्ष ओलाँद यांनी अतिसतर्कतेचा इशारा देत संचारबंदीची घोषणा केली आहे. फ्रान्सच्या सर्व सीमा बंद करण्यात आली आहेत. दीड हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2015 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close