S M L

पॅरिसने अनुभवला मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्यासारखा थरार

Samruddha Bhambure | Updated On: Nov 14, 2015 08:00 PM IST

पॅरिसने अनुभवला मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्यासारखा थरार

14 नोव्हेंबर : पॅरिसमधला हल्ला मुंबईत घडलेल्या 2008च्या थराराची आठवण करून देणारा आहे. मुंबईत ज्या पद्धतीनं इस्लामिक कट्टरतावाद्यांनी अतिशय सूत्रबद्ध आणि संघटितपणे हल्ला केला, तसाच हा पॅरिसमधला हल्ला आहे.

भारतच नव्हे, संपूर्ण जग या हल्ल्यानं हादरून गेलं होतं... क्रूरकर्मा कसाबने शेकडो निष्पापांचे अमानुषपणे बळी घेतले. सीएसटी रेल्वे स्टेशन, कॅफे लिओपॉड अशा विविध 7 ठिकाणी सागरी मार्गानं आलेल्या दहशतवाद्यांनी रक्ताचा सडा पाडला होता. पॅरिसमध्ये शुक्रवारी म्हणजे 13/11चा हल्ला हा पूर्णपणे मुंबई हल्ल्याची कॉपी आहे. तेच स्फोट, तोच गोळीबार आणि रक्तपात घडवण्याची तीच मोडस ऑपरेंडी. पाकचा दहशतवादी क्रूरकर्मा अजमल कसाबनं त्याच्या साथीदारांसह मुंबईतही असाच भ्याड हल्ला घडवला होता.

मुंबईत 2008 मध्ये अतिशय नियोजनबद्धरीत्या घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच पॅरिसचा हल्ला आहे. त्यात महत्त्वाचं 26/11 आणि 13/11 या तारखांपासून हल्ल्याचं साम्य स्पष्ट व्हायला सुरुवात होते. मुंबई 26/11 तर पॅरिसमध्ये 13/11. मुंबईमध्ये रात्री 9.30च्या सुमारासच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता तर तीच वेळ पॅरिससाठीही धोक्याची ठरली. वर्दीळीच्या ठिकाणांना कसाबनं साथीदारांसह लक्ष्य केलं तर पॅरिसध्येही स्टेडियम आणि रेस्टॉरंटला टार्गेट केलं गेलं. मुंबईतही बंदुकीच्या धाकानं नागरिकांना ओलीस ठेवलं गेलं आणि पॅरिसच्या बँतक्लाँ कॉन्सर्ट हॉलमध्ये नागरिकांना दहशतवाद्यांनी वेठीस धरलं होतं. खूप साम्य दिसलं या दोन्ही हल्ल्यांत.

पॅरिसमधला हल्ला मुंबई स्टाईल हल्ला आहे. स्फोट, अंदाधुंद गोळीबार मुंबईतही झाला आणि पॅरिसमध्येही... निष्पापांचे बळी गेले मुंबईतही आणि पॅरिसमध्येही... लोकशाही असलेल्या भारताला हल्लेखोरांनी निशाणा केलं होतं, तर पॅरिसमध्येही मानवतेवरचा हल्ला स्पष्ट झाला. एकाचवेळी विविध गटांकडून अनेक ठिकाणी हल्ले करून मोठा घातपात करायचा हा या हल्ल्याचा हेतू. आता तरी सारे देश मिळून या दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एकत्र येणार का? हा खरा प्रश्न या हल्ल्यानंतर विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2015 07:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close