S M L

फ्रान्सचं चोख प्रत्युत्तर, आयसिसच्या तळांवर बॉम्बहल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2015 01:39 PM IST

फ्रान्सचं चोख प्रत्युत्तर, आयसिसच्या तळांवर बॉम्बहल्ला

16 नोव्हेंबर :  पॅरिसमधील आत्मघातकी हल्ल्यानंतर दोनच दिवसांत फ्रान्सने 'आयसिस'विरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. फ्रान्सच्या हवाईदलाने रविवारी सीरियातील रक्का इथल्या आयसिसच्या तळांवर बॉम्बहल्ला चढवला. फ्रान्स सरकारनेच एका निवेदनाद्वारे याबद्दल माहिती दिली.

शुक्रवारी आयसिसच्या दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये सहा ठिकाणी दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात 132 जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 350 जण जखमी झालेत. या हल्ल्यानंतर आयसिसला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी फ्रान्सने केली होती. आतापर्यंत काहीशी नरमाईची भूमिका घेणार्‍या फ्रान्सने आता मात्र कठोर पावलं उचलत आयसिसविरोधात युद्धच पुकारलं आहे.

फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईबाबत माहिती देताना, हवाईदलाने केलेल्या कारवाईत 'आयसिस'ची एक कमांड पोस्ट आणि ट्रेनिंग कॅम्प उद्‌ध्वस्त करण्यात यश आल्याचे सांगितले. या कारवाईत फ्रान्सच्या 12 लढाऊ विमानांचा सहभाग होता आणि त्यातील 10 विमान बॉम्बचा मारा करणारी होती. आतापर्यंत आयसिसच्या अड्‌ड्यांवर 20 बॉम्ब फेकण्यात आले आहेत, असंही फ्रान्सच्या संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2015 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close