S M L

एमएमआरडीए उतरणार जलवाहतुकीत

9 फेब्रुवारीमुंबईतली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीए आता जलवाहतुकीचा पर्याय खुला करणार आहे. ईस्टर्न फ्रंटवरच्या भाऊच्या धक्क्यापासून मांडव्यापर्यंतच्या या प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी 'आयबीएन-लोकमत'ला ही माहिती दिली आहे. यामुळे ट्रॅफिकवरचा ताण कमी होऊन रत्नागिरी, अलिबाग, गोव्याकडे जाणार्‍या गाड्या अगदी काही मिनिटांत वडखळ नाक्यापर्यंत पोहोचतील, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.याशिवाय एमएमआरडीएने 250 किलोमीटरचा मोनारेलचा नवा मास्टर प्लॅन बनला आहे. यातून जिथे बस, लोकल पोहचू शकत नाहीत, अशा शहरातल्या गर्दीच्या भागांमधील वाहतुकीची समस्या या मोनोरेलमुळे सुटण्यास मदत होईल, असेही गायकवाड म्हणाले. मोनोरेलचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत तर दुसरा टप्पा जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मीलन सबवे आणि डॉ. आंबेडकर मार्गावरचे सर्व फ्लायओव्हर डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. वडाळ्यापर्यंत जाणारा ईस्टर्न फ्री वे मे 2011पर्यंत पूर्ण होणार आहे. पांजरापोळ, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड हे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. मोनोरेलचा प्रोजेक्ट रखडला तर दररोज 50 लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील, आणि मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2010 02:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2010 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close