S M L

शिवसेना विरुद्ध सरकार

9 फेब्रुवारी'शाहरूख खान विरुद्ध शिवसेना' या संघर्षाने आता 'सेना विरुद्ध राज्य सरकार' असे रुप धारण केले आहे. पोलीस संरक्षणात आंदोलन करणार्‍या रवींद्र वायकर, प्रकाश सावंत आणि अनिल परब या शिवसेनेच्या आमदारांचे पोलीस संरक्षण सरकारने काढून घेतले. त्यानंतर शिवसैनिकांनी माय नेम इज खान या शाहरुख खानच्या सिनेमाच्या विरोधात आंदोलन तीव्र केले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील थिएटर्सना टार्गेट केले.मुख्यमंत्र्यांचा इशाराया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अशाच पद्धतीने शिवसेनेने कायदा हातात घेतला तर सेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचेही संरक्षण काढून घेऊ, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. उद्धव यांचे उत्तरत्यावर 'तुम्ही काय सुरक्षा काढता, मीच ही सुरक्षा नाकारतो' असे उत्तर देत उद्धव यांनी सरकारी सुरक्षा परत केली. तर आम्ही बाळासाहेब आणि उद्धव यांचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहोत, अशी ग्वाही रवींद्र वायकर यांनी दिली.तर उद्या शिवसेनेचे सर्व आमदार सरकारी सुरक्षा परत करतील, असे शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी जाहीर केले.आर आर यांचा इशारादरम्यान आंदोलन करण्यासाठी शिवसैनिकांना चिथावणी देणार्‍या नेत्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनीही दिला आहे.राडा आणि कारवाई दुसरीकडे आज दिवसभरात सिनेमाच्या विरोधात मुंबईत थिएटर्सवर आंदोलन करणार्‍या साडेतीनशेहून अधिक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दक्षिण मुंबईत मेट्रो थिएटर, कांजूरमार्ग इथे हुमा सिनेमा, उपनगरांमध्ये मुलुंड येथील मेहुल सिनेमा, पंतनगरमधील फेम सिनेमा, घाटकोपर येथील आर सीटी मॉल इथे शिवसैनिकांनी आंदोलन करून मोडतोड करण्याचा प्रयत्न केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2010 05:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2010 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close