S M L

सुरक्षेचा दावा फोल, सिनेमाचे बुकिंग बंद

10 फेब्रुवारीमाय नेम इज खान या सिनेमाला सुरक्षा देण्याचा पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. फक्त मुंबईतच नाही तर राज्यात सगळीकडेच या सिनेमाचे ऍडव्हान्स बुकिंग रद्द झाले आहे. मुंबई, ठाण्यात दादागिरी मुंबईत आणि ठाण्यात बिग सिनेमा आणि सिनेमॅक्सच्या थिएटरमध्ये ऍडव्हान्स बुकिंग बंद झाली आहेत. 'माय नेम इज खान'ला सेनेचा विरोध वाढतोच आहे. सिनेमॅक्स थिएटरमधे लागलेली या सिनेमाची पोस्टर्स शिवसैनिकांनी काढून टाकली आहेत. शिवसैनिकांच्या आंदोलनाला घाबरुन मोठ्या वितरकांनी सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बंद केली आहे. जुहू येथील पीव्हीआर आणि चंदन सिनेमामध्ये शिवसैनिकांनी बुकिंग बंद पाडले. कांदिवली पूर्व येथील हायवेलगत असलेल्या ब्रॉड वे थिएटरवर तुरळक दगडफेकही झाली. राज्यात बुकिंग बंद मुंबईव्यतिरिक्त राज्यात इतर ठिकाणीही शिवसेनेचे हे आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातील पार्वती मल्टिप्लेक्समध्ये 'माय नेम इज खान'चे ऍडव्हान्स बुकिंग बंद करण्यात आले आहे. औरंगाबादमध्येही सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतल्याचा दावा शिवसेनने केला आहे. तिथेही ऍडव्हान्स बुकिंग बंद करण्यात आले आहे. तर धुळ्यात या सिनेमाची पोस्टर्स फाडण्यात आली आहेत. सोलापुरात भागवत आणि प्रभात थिएटरच्या मालकांनी सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधल्या थिएटर्सनी 'माय नेम इज खान'चे ऍडव्हान्स बुकिंग केले नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2010 08:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2010 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close