S M L

..तर 6 महिन्यांत मला अटक करा- राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Nov 19, 2015 06:59 PM IST

rahul gandhi

19 नोव्हेंबर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिलं आहे. मोदी सरकारने त्यांच्यावर आरोप लावण्याऐवजी 6 महिन्यांत चौकशी करावी आणि त्यात काही आढळल्यास आपल्याला अटक करावी असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी इंदिरा गांधीच्या 98 व्या जयंतीच्या निमित्ताने नवी दिल्लीत आयोजित यूथ काँग्रेसच्या एका कार्यक्रमात मोदींना हे आव्हान दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा आरोप केला होते. आज राहुल गांधींनी त्याला सडेतोड उत्तर दिलं. "मोदीजी तुमचं सरकार आहे. तुमच्याकडे तपाससंस्था आहे. माझ्या मागे चौकशी यंत्रणा लावा, आणि त्यात काही तथ्य आढळलं तर 6 महिन्यांत अटक करा. पण रोज माझ्या कुटुंबावर असं आरोप करणं बंद करा, असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2015 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close