S M L

'राड्या'चा वणवा राज्यभर

10 फेब्रुवारीशाहरूख खानविरोधातल्या शिवसेनेच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. मुख्यत: यात शिवसैनिकांचे टार्गेट आहे, मुंबईतील थिएटर्स. टार्गेट मुंबईकाल आणि आज दिवसभर शिवसेनेने मुंबईत आंदोलन सुरूच ठेवले आहे. अंधेरीत शाहरूखचे पोस्टर फाडण्यात आले. तर कांदिवलीतही असाच प्रकार शिवसैनिकांनी केला. मरोळमध्ये माय नेम इज खानच्या पोस्टरवर शिवसैनिकांनी काळे फासले.राज्यभर लोणराज्यातील प्रमुख शहरांमध्येही हे आंदोलनाचे लोण पसरले आहे. कोल्हापुरातील पार्वती मल्टिप्लेक्समध्ये 'माय नेम इज खान'चे ऍडव्हान्स बुकिंग बंद करण्यात आले आहे. औरंगाबादमध्येही सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतल्याचा दावा शिवसेनने केला आहे. तिथेही ऍडव्हान्स बुकिंग बंद झाले आहे. तर धुळ्यात 'माय नेम इज खान'ची पोस्टर्स फाडण्यात आली आहेत. सोलापूरमध्ये भागवत आणि प्रभात थिएटरच्या मालकांनी सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये या सिनेमाची बुकिंग थिएटर मालकांनी सुरू केली नाहीत. पुण्याजवळ निगडी इथे टिळक चौकात शिवसैनिकांनी शाहरुखचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.नागपूरमध्येही शिवसेनेने 'माय नेम इज खान'ची पोस्टर्स फाडली आहेत. इथे पोलिसांनी आतापर्यंत 35 शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2010 12:39 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2010 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close