S M L

दहशतवाद्यांना मदत करू नका, मोदींनी पाकला सुनावलं

Sachin Salve | Updated On: Nov 22, 2015 06:41 PM IST

दहशतवाद्यांना मदत करू नका, मोदींनी पाकला सुनावलं

22 नोव्हेंबर : दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी घातक आहे. दहशतवादाला कोणतीही सीमा नाही, कोणताही धर्म अथवा रंग नाही. दहशतवाद रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तसंच कोणत्याही देशाने दहशतवाद्यांना मदत करू नये असं सांगत अप्रत्यक्षपणे पाकिस्तानाला सुनावलं.

मलेशिया आंतराराष्ट्रीय एक्झिबिशन आणि कनवेंशन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना संबोधित करताना आज पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाला कोणतीही सीमा नाही, धर्म नाही, रंग नाही. आज जगभरावर दहशतवादाचं संकट आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र आलं पाहिजे. कोणत्याही देशाने दहशतवाद्यांना मदत केली नाही पाहिजे असं सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानाला सुनावलं. तसंच इंटरनेटचा वापर हा अतिरेक्यांच्या भरतीसाठी होऊ नये असं मतही मोदींनी व्यक्त केलं. याआधी MIECC मध्ये मोदींनी जवळपास 20 हजार लोकांसमोर भाषण केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2015 06:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close