S M L

भारतात असहिष्णुता वाढली,किरणनं देश सोडण्याचं सुचवलं होतं -आमिर

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2015 03:44 PM IST

भारतात असहिष्णुता वाढली,किरणनं देश सोडण्याचं सुचवलं होतं -आमिर

24 नोव्हेंबर : देशातल्या वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आता परफेक्शनिस्ट आमिर खाननंही आपलं मत मांडलंय. देशात वाढत्या असहिष्णुतेमुळे माझ्या कुटुंबाला देशात राहायची भीती वाटते, असं आमीर खाननं म्हटलंय. माझी बायको किरण राव हिला मुलांना घेऊन परदेशात जाऊन राहावंस वाटत होतं तसं तिने बोलूनही दाखवलं, असंही आमिर म्हणाला. रामनाथ गोयंका पुरस्कार समारंभात आमिर खानची प्रकट मुलाखत घेण्यात आली यावेळी त्याने आपलं रोखठोक मत व्यक्त केलं.

आमिर म्हणतो, मलाही थोडी असुरक्षितता जाणवतीये, भीती जाणवतीये.गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून ही भीती जास्त जाणवतेय. याबद्दल मी माझी पत्नी किरणशीही बोललो. मी आणि किरण आम्ही दोघेही भारतातच वाढलो आहोत. पण पहिल्यांदाच किरण असं म्हणाली की, आपण देश सोडून जाऊया. किरणचं हे अत्यंत धक्कादायक वक्तव्य होतं. तिला आमच्या मुलाची भीती वाटतेय. जे आजूबाजूचं वातावरण आहे त्याची भीती वाटतेय.तिला रोजचं वृत्तपत्रं उघडायचीही हल्ली भीती वाटते. हे वातावरणातली अस्वस्थता वाढत असल्याचं उदाहरण आहे. विशेष म्हणजे, अतुल्य भारताची जाहिरात करणार्‍या आमिरनं असं विधान केल्यानं ट्विटरवरही प्रतिक्रियांना वेग आलाय.

दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आमिरच्या वक्तव्यावरून मोदी सरकारवर टीका केलीये. "मोदी सरकारवर टीका करणार्‍यांना देशद्रोही किंवा देशविरोधी असं म्हणण्यापेक्षा सरकारने त्या लोकांशी संवाद साधावा. त्यांना कसला त्रास होतेय हे जाणून घ्यावं. भारतात समस्या अशाप्रकारे सुटतात. धमकावून किंवा टीका करून काहीही होत नाही" असा टोला राहुल गांधींनी लगावला. तर आमिर खान म्हणतोय ते खरं आहे. हे स्पष्ट बोलल्याबद्दल मी त्याचं कौतुक करतो अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटवरून दिली.

विशेष म्हणजे, भारतात असहिष्णुता वाढत असल्याचं बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान यानंही काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावरून त्याच्यावर बरीच टीकाही झाली होती. त्यानंतर आज आमिरने मत मांडल्यामुळे त्यात आणखी भर पडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2015 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close