S M L

माझं यकृत 75 टक्के व्हायरसने निकामी, बिग बींचा धक्कादायक खुलासा

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2015 02:00 PM IST

माझं यकृत 75 टक्के व्हायरसने निकामी, बिग बींचा धक्कादायक खुलासा

24 नोव्हेंबर : महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रकृतीबद्दल अतिशय गंभीर आणि धक्कादायक माहिती दिली आहे, आपलं यकृत हे फक्त 25 टक्के ठिक असल्याचं महानायकाने स्पष्ट केलंय.

अमिताभ बच्चन यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चालवल्या जाणार्‍या हेपेटायटीस बी विरोधी मोहिमेचे ब्रँड ऍम्बेसेडर बनवण्यात आलंय त्यावेळी त्यांनी हे सांगितलं. 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी मला अपघात झाला होता, आणि त्याच्या उपचारादरम्यान, मला एकूण 60 बाटल्या रक्त चढवलं होतं. या रक्त संक्रमणादरम्यान माझ्या शरीरात हेपेटायटीस बी व्हायरस शिरला. आणि 18 वर्षं तो सुप्त राहिला. 2000 साली वैद्यकीय तपासणीदरम्यान मला डॉक्टरांनी सांगितलं की, तुमचं 75 टक्के यकृत या व्हायरसनं निकामी केलंय, असं अमिताभ यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2015 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close