S M L

तुरुंगातच कैद्याची पार्टी, काजू-बदामचा चकणा आणि मटणाचा बेत !

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2015 02:30 PM IST

तुरुंगातच कैद्याची पार्टी, काजू-बदामचा चकणा आणि मटणाचा बेत !

24 नोव्हेंबर : तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी धाडलं जातं हे खोटं ठरवणारी एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात चक्क कैद्यांची तुरुंगातच पार्टी केली असल्याचं समोर आलंय. हे कैदी दारू पितायत आणि गांजा ओढातायत. एवढंच नाहीतर बदाम आणि काजूचा चकणा आणि मटणाचा बेत या कैद्यांसाठी आहे.

या प्रकारामुळे कळंबा कारागृहाच्या बेजबाबदार कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कैद्यांची ही मजा, पार्टी कुणाच्या जीवावर सुरू आहे ? कैद्यांना दारुच्या बाटल्या, गांजा तुरुंगात कुणी आणून दिल्या, जेवणासाठी मटण कसं आणलं हाही प्रश्नच आहे. ही व्हिडिओ क्लीप जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यानं सामाजिक संस्थेला दिली असल्याचं कळतंय. पण, कळंबा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर यामुळे ताशेरे ओढले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2015 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close