S M L

आमिरच्या वक्तव्यावर बॉलिवूडकर काय म्हणाले ?, वाचा एकाच पेजवर

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2015 04:33 PM IST

आमिरच्या वक्तव्यावर बॉलिवूडकर काय म्हणाले ?, वाचा एकाच पेजवर

24 नोव्हेंबर : अभिनेता आमिर खानने देश सोडण्याची भाषा केल्यामुळे एकच वाद पेटलाय. काही जण आमिरच्या बाजूने आहे तर काही विरोधात आहे. ज्या बॉलिवूडमधून आमिर नावारुपास आला त्या बॉलिवूडकरांनीही आमिरच्या वक्तव्यावर कुठे नाराजी तर कुठे पाठिंबा दिलाय. बघुया कोण काय म्हणालं...

ख्यातनाम अभिनेते ऋषी कपूर यांनी आमिर खानला कडक सल्ला दिलाय.

- मिस्टर आणि मिसेस आमिर खान, गोष्टी जेव्हा बिघडतात, आणि समाज व्यवस्थेत दुरुस्तीची गरज असते, तेव्हा ती दुरुस्त करा, सुधारा. त्यापासून दूर पळू नका. नाहीतर ती हीरोगिरी होते.

सुप्रसिद्ध राम गोपाल वर्मा - देश असहिष्णू आहे असं म्हणणं चूक आहे. भारत हा जगात सर्वात जास्त सहिष्णू देश आहे. पाश्चात्य देशांमध्ये असहिष्णुता खूप जास्त आहे. आमिरला लोक खूप मानतात. त्याच्या अशा म्हणण्यानं देशाबद्दल चुकीचा संदेश जातो

अभिनेत्री रवीना टंडन हिनेही आमिरचं नाव न घेता टीका केलीये.

- थेट मुद्द्यावर येऊ. मोदी पंतप्रधान झाल्यापासून हे लोक खूश नाहीयेत, असं ते उघडपणे का नाही म्हणत?

अनुपम खेर - आमिर तू किरणला विचारलंस का, तिला कोणत्या देशात जायला आवडेल? याच देशाने तुला आमिर खान बनवलं.

तू अतुल्य भारत ही जाहिरात केल्यावर 7 ते 8 महिन्यांत तुला भारत असहिष्णु कसा वाटतो?

फराह खान - माहिती नाही देशात काय चाललंय. पण माझं स्पष्ट मत आहे की, माझा देश जगात सर्वात सहिष्णु देश आहे. काही लोकांमुळे देशाचं भाकित ठरवू शकत नाही.

भाजपचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी आमिरची पाठराखण केलीये.

- आमिरच्या वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का नाही बसणार. लोक समजदार आहे, आमिर विचारपूर्वकच बोलत असतो. आमिर मुस्लिमपेक्षा मोठा मुस्लिम आहे आणि हिंदूपेक्षा मोठा हिंदू आहे, त्याला देशद्रोही नाही म्हटलं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2015 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close