S M L

आमिर प्रकरणात मला ओढू नका-रहमान

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2015 01:47 PM IST

आमिर प्रकरणात मला ओढू नका-रहमान

25 नोव्हेंबर : आमिर खानने देशात असहिष्णुता वाढली असून देश सोडण्याची भाषा केली. त्यामुळे सर्वत्र टीका होता आहे. पण या वादात मला ओढू नका असा पवित्रा प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी घेतलाय. तसंच कोणतीही समस्य असो, ती शांतपणे आणि अहिंसेच्या मार्गानं सोडवावी, अशी आपल्याला महात्मा गांधींची शिकवण आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा प्रयोग करणं योग्य नाही असं रहमान यांनी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वीच रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या 'मोहम्मद-मेसेंजर ऑफ गॉड' मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. मुंबईतील रझा अकादमीने त्यांच्याविरोधात फतवाही काढला होता. काल आमिर खानने देशात असहिष्णुता वाढत असून आपल्या पत्नीने देश सोडण्यासाठी सुचवलं होतं असं मत व्यक्त केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. असहिष्णुतेच्या मुद्यावर ए.आर. रहमान म्हणतात,

कोणत्याही प्रकारची हिंसा होता कामा नये. आपण सुसंस्कृत लोक आहोत. आपली संस्कृती सर्वोत्तम आहे, हे आपण जगाला दाखवून दिलं पाहिजे. विरोधालाही पद्धत हवी. तसंच असहिष्णुतेच्या मुद्द्यावर लेखक आणि विचारवंतांनी जी मतं मांडली, ती मला काव्यात्मक वाटली. ती मतं त्यांनी शांततेत्या मार्गनं व्यक्त केली होती. पण कालच्या आमिर खानच्या मुद्द्यावर रहमाननं प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला यात ओढू नका, असंही ते म्हणाले.

तर अभिनेता अर्शद वारसी यांनंही असहिष्णुतेवर आपलं मत मांडलंय. इतके धर्म असूनही आपण एकत्र राहतो, जगातल्या अनेक देशांपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे, असं तो म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2015 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close