S M L

इथं अख्ख गाव रोजगार हमी योजनेच्या कामावर !

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2015 04:17 PM IST

इथं अख्ख गाव रोजगार हमी योजनेच्या कामावर !

25 नोव्हेंबर : लातूरच्या वांजरखेडा गावच्या सरपंचांनी गाव सोडल्याची घटना घडलीये. लातूरला लागूनच असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावांची काही वेगळी परिस्थिती नाहीय. इथं डोकेवाडी हे अख्ख गाव पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करतंय.

दुष्काळाचं संकट हे दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय. उस्मानाबाद जिल्यात तर दुष्काळ आता पराकोटीला जावून पोहचलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी, शेतमजूर अक्षरशः भटकंती करताना दिसतोय. अनेक शेतकर्‍यांनी या दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. तर अनेक जण आपली गावं सोडून विस्तापित झाली आहे. भूम तालुक्यातील डोकेवाडी हे अख्ख गाव पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावरती काम करतंय. दुदैर्वाची बाब म्हणजे या कामावर महिला, आणि वृद्धांनाही रोजगार हमी योजनेवर काम करावं लागतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2015 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close