S M L

देश सोडणार नाही, पण विधानावर ठाम -आमिर खान

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2015 09:52 PM IST

देश सोडणार नाही, पण विधानावर ठाम -आमिर खान

24 नोव्हेंबर : असहिष्णुतेच्या मुद्यावर अभिनेता आमिर खानने भारत सोडण्याचं वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला. अखेर या वादानंतर आमिरने खुलासा केलाय. माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडायचा कुठलाही विचार नाही. आम्ही तसं कधी केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही असं आमिरने स्पष्ट केलं. परंतु, मी मुलाखतीत जे काही म्हटलं त्यावर मी ठाम आहे. जो कुणी मला राष्ट्रविरोधी म्हणतोय त्याला मी सांगू इच्छितो की भारतीय असण्याचा मला अभिमान आहे. त्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही असंही आमिरने ठणकावून सांगितलं.

देशात राहण्यासाठी आता माझ्या कुटुंबियांना भीती वाटते. माझ्या पत्नीने मला देश सोडून जाण्याचं सुचवलं होतं असं वादग्रस्त वक्तव्य आमिर खानने केलं होतं. आमिर खानच्या या वक्तव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. सर्वच राजकीय पक्षांनी आमिरवर सडकून टीका केली. दोन दिवस चाललेल्या या वादावर अखेर आमिरने तोंड उघडलं. आमिर म्हणतो, माझा किंवा माझ्या पत्नीचा देश सोडायचा कुठलाही विचार नाही, हे मी स्पष्ट करतो. आम्ही तसं कधी केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. विरोध करणार्‍यांनी एकतर माझी मुलाखत बघितलेली नाही किंवा माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक वेगळा अर्थ काढला जात आहे. भारत माझा देश आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे. इथं जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे आणि इथेच मी राहतोय असं आमिर म्हणाला.

तसंच "मी मुलाखतीत जे काही म्हटलं त्यावर मी ठाम आहे. जो कुणी मला राष्ट्रविरोधी म्हणतोय त्याला मी सांगू इच्छितो कीष भारतीय असण्याचा मला अभिमान आहे. त्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. माझ्या मनातलं बोलल्याबद्दल जे कुणी माझ्यावर असभ्य आरडाओरड करत आहेत त्यांना सांगायला मला दु:ख होतंय की मी जे बोललो ते तुम्ही खरं ठरवत आहात. जे माझ्याबाजूने उभे राहिले त्यांचे आभार मानतो.

या सुंदर आणि एकमेवाद्वितिय गोष्टी आहेत, त्याला जपण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला देशाची एकात्मता, विविधता, सर्वसमावेशकता, इतक्या भाषा, संस्कृती, इतिहास, सहिष्णुता, एकांतवादाचा सिद्धांत, इथलं प्रेम, संवेदनशीलता, भावनिक ताकद या सगळ्याचं रक्षण केलं पाहिजे असंही आमिर म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2015 09:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close