S M L

मुख्यमंत्री फडणवीस गृहमंत्रिपद सोडण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2015 09:48 PM IST

cm devendra fadanvis425 नोव्हेंबर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत चर्चेला वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे असलेलं गृह खातं बदलण्याची शक्यता विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. गृहमंत्रिपद गिरीष महाजनांकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपच्या कोअऱ कमिटीच्या बैठकीनंतर आज भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक होतेय. मंत्रिमंडळाचा विस्तार बरोरबच खाते बदलाची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक मंत्र्यांची खाती कमी होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ाुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे, विनोद तावडे,एकनाथ खडसे यांच्याकडील अतिरिक्त खाती कमी होणार आहे.

तर रणजीत पाटील यांना डच्चू मिळण्याची शक्यता असून त्यांच्याकडी गृहराज्य मंत्रीपद काढून घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे घटकपक्षांच्या नेत्यांना यावेळी संधी मिळणार आहे. स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना लालदिवा मिळण्याची शक्यता आहे.

यांना मिळणार संधी

पांडुरंग फुडकर - बुलडाणा

मदन येरावार - यवतमाळ

गोवर्धन शर्मा - अकोला

सुरेश खाडे - सांगली

जयकुमार रावल - धुळे

संभाजी पाटीव निलंगेकर - लातूर

स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाभाऊ खोत

- यांना मिळणार डच्चू

रणजीत पाटील गृह राज्य मंत्री

- यांची खाती कमी होतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह

एकनाथराव खडसे - राज्य उत्पादन

चंद्रकांत दादा पाटील - वस्त्रद्योग आणि पणन

पंकजा मुंडे -जलसंधारण

विनोद तावडे - वैद्यकीय शिक्षण

गिरीष महाजन - जलसंपदा

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2015 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close