S M L

पुरस्कार परत करणारे साहित्यिक गणेश देवींना जीवे मारण्याची धमकी

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2015 08:33 PM IST

पुरस्कार परत करणारे साहित्यिक गणेश देवींना जीवे मारण्याची धमकी

26 नोव्हेंबर : देशात असहिष्णूतेवरून वादळ उठले असतानाच आता साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार परत करणारे गणेश देवी यांना पुरस्कार परत केल्या दिवसापासून धमक्या येत आहेत. कोल्हापुरात आयोजित दक्षिणायन ह्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलीय.

सरकारशी संबंधित प्रत्येक संस्था आणि सरकारचे हितसंबंध राखणार्‍या व्यक्तींनी प्रत्यक्ष भेटून धमकावल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. देशात शांतता राहावी यासाठी आपण अद्याप यावर भाष्य केले नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या धमक्यांनी आपण घाबरून गेलो नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दाभोलकर पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या झाल्यावर अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर मध्ये दक्षिणायन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रबोध पारीख आणि गणेश देवी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमात कोल्हापूर मधील अनेक पुरोगामी संघटना आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2015 08:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close