S M L

भारताचा द.आफ्रिकेवर दणदणीत विजय,मालिकाही खिश्यात

Sachin Salve | Updated On: Nov 27, 2015 07:14 PM IST

भारताचा द.आफ्रिकेवर दणदणीत विजय,मालिकाही खिश्यात

27 नोव्हेंबर : नागपूर टेस्टमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवलाय. 124 रन्सने भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलाय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टेस्ट मालिकेत 2-0 ने आघाडी घेत मालिका खिश्यात घातलीये. 11 वर्षांनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवलाय. तर 9 वर्षांनंतर द.आफ्रिका परदेशात मालिका पराभूत झालीये.

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 310 रन्स टार्गेट ठेवलं होतं. दुसर्‍या दिवशीचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्स गमावत 32 धावा केल्या होत्या. विजयासाठी त्यांना 278 रन्सची गरज होती. पण आफ्रिकनं टीमचा डाव गडगडला. एकापाठोपाठ एक गडी पव्हेलियनमध्ये परतला. आर.आश्विनने शानदार बॉलिंग करत 7 विकेट घेतल्यात तर अमित मिश्राने 3 विकेट घेतल्यात. तर दुसर्‍या डावात टीम इंडिया 173 रन्सवर ऑल आऊट झाली होती.

शिखर धवननं सर्वाधिक 39 रन्स केले. तर चेतेश्वर पुजारानं 31 रन्स केले. दक्षिण आफ्रिकेकडून इम्रान ताहीरनं 5 विकेट्स घेतल्या होत्या.

विशेष म्हणजे नागपूर टेस्ट गाजली ती पिचमुळे. अत्यंत खराब पिचमुळे बॉलर्सची भंबेरी उडाली तर बॅटसमनची घसरगुंडी झाली. नागपूरच्या खेळपट्टीवर काल एका दिवसात 20 विकेट्स गेल्यात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळासाठी यजमानांसाठी इतकी अनुकूल असलेली खेळपट्टी ठेवावी का, असा प्रश्न विचारला जातोय. पण अखेर आज वादावर पडला असून टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 124 रन्सने विजय मिळवत मालिका खिश्यात घातलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2015 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close