S M L

लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2015 02:39 PM IST

लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

28 नोव्हेंबर : मुंबईची लाईफलाईन असणार्‍या लोकल ट्रेनचा प्रवास मुंबईकरांना सवयीचा असला तरी तो तितकाच धोकादायकही आहे. लोकलच्या जीवघेण्या गर्दीत प्रवाशांनी टपावरून किंवा दाराला लटकून प्रवास करू नये असं सतत सांगितलं गेलं तरी काही प्रवाशांचा याचा मोह आवरत नाही. गर्दीच्यावेळी लोकलच्या दाराला लटकून प्रवास करणार्‍या भावेश लकापे या तरुणचा लोकलमधून पडून मृत्यू झाला.

डोंबिवलीत राहणारा भावेश हा सकाळी सीएसटीला जाण्यासाठी डोंबिवलीमधून 8.59 च्या लोकलमध्ये चढला होता. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यानं तो दाराला लटकून प्रवास करत होता कोपर ते दिव्या दरम्यान त्याचा खांबावरचा हात सुटला आणि तो रूळावर पडला.

त्याला शास्त्री नगर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. आयबीएन-लोकमतचं सर्व प्रवाशांना आवहान आहे की..लोकलमधून प्रवास करताना असा जीव धोक्यात घालू नका.

जीवघेणा प्रवास-

मुंबईत लोकलच्या गर्दीचे गेल्या 10 वर्षांतले बळी

लोकलमधून पडलेल्यांची संख्या- 25,722

यापैकी 6,989 प्रवाशांचा मृत्यू

यातून 18,733 प्रवासी बचावले

लोकलमधून पडून मृत्युमुखी

2005 - 494 मृत्युमुखी

2013- 901 प्रवासी मृत्युमुखी

2014- 797 प्रवासी मृत्युमुखी

रुळ ओलांडतांना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या-22,289

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2015 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close