S M L

शिवसैनिक दुष्काळ दौर्‍यावर, शेतकर्‍यांच्या भेटीगाठी सुरू

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2015 01:43 PM IST

शिवसैनिक दुष्काळ दौर्‍यावर, शेतकर्‍यांच्या भेटीगाठी सुरू

28 नोव्हेंबर : शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आजपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर असून शेतकर्‍यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या आहेत. मराठवाड्यातला दुष्काळ समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय.

आज दिवसभर त्यांचा कार्यक्रम चालणार असून शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना शिवसेनेतर्फे मदत दिली जाणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा रविवारी नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत.

एकूणच काय तर 7 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्यावरुन कदाचित शिवसेना अधिक आक्रमक होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2015 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close