S M L

राजनाथ सिंग यांच्यावर 'त्या' आरोपामुळे लोकसभेत 'असहिष्णुता'

Sachin Salve | Updated On: Nov 30, 2015 05:54 PM IST

राजनाथ सिंग यांच्यावर 'त्या' आरोपामुळे लोकसभेत 'असहिष्णुता'

30 नोव्हेंबर : असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून लोकसभेत वादळी चर्चेला सुरूवात झाली आहे. सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांनी देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी 800 वर्षांत पहिल्यांदाच एक हिंदू भारताचा पंतप्रधान झाला असं राजनाथ सिंग यांनी वक्तव्य केलं होतं असा गंभीर आरोप सलीम यांनी केला. सलीम यांच्या आरोपामुळे सिंग चांगलेच भडकले आणि त्यांनी माफीची मागणी केली. त्यामुळे लोकसभेत एकच गोंधळ उडाला आणि पहिल्याच दिवस वादमय स्थगित झाला.

गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेला असहिष्णुता,सहिष्णुता वादाचे पडसाद संसदेतही उमटले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चर्चेच्या सुरुवातील कुणी असहिष्णुतेवर मुद्दा उपस्थित करत असेल तर सहिष्णुता दाखवावी अशी विनंतीच केली. तर राजनाथ सिंग यांनी असहिष्णुता वाढली असं वाटत असेल तर त्यांनी यावर काही सुचना द्यावात असं स्पष्ट केलं.

सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांनी चर्चेला सुरुवात केली. देशात सध्या असहिष्णुता इतकी वाढलीये की, त्यासाठी असहिष्णुता शब्दही अपुरा आहे. कुणी काय खावं आणि काय खाऊ नये यावरही निर्बंध यायला लागले आहे. एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनी आता भिती वाटायला लागलीये. घरात गोमांस ठेवलं याच्या संशयावरुन अखलाकाची हत्या घडली. त्याअगोदर डॉ.कलबुर्गी यांची हत्या झाली. त्या अगोदर दाभोलकर यांचीही हत्या झालीये. जेव्हा दलितांचं मुद्दा येतो तेव्हा त्याची तुलना कुत्र्याच्या पिल्याशी केली जाते अशी वक्तव्य आपलेच मंत्री महोदय करताय. अशा मंत्र्यांना सहन करावे लागते ही खरंच सहनशक्ती आहे असं परखड मत सलीम यांनी मांडलं.

त्यानंतर त्यांनी एका मासिकातील लेखाचा दाखला देत 800 वर्षांत पहिल्यांदाच एक हिंदू भारताचा पंतप्रधान झाला असं वक्तव्य एका मंत्र्याकडून केलं गेलं. त्यांचं नाव राजनाथ सिंह होतं असा उल्लेख केला. सलीम यांच्या उल्लेखामुळे राजनाथ सिंग यांनी यावर आक्षेप घेतला. आपण असं कधीच म्हटलं नाही. सलीम यांनी ते सिद्ध करून दाखवावं अन्यथा माफी मागावी अशी मागणीच सिंग यांनी केली. तर सलीम यांनी सिंग यांनीच जाहीरपणे सांगून टाकावं की आपण म्हटलं की नाही असं प्रतिआव्हान केलं.

राजनाथ सिंग आणि सलीम यांच्या खडाजंगीमुळे एकच गोंधळ उडाला. लोकसभेच कामकाज दुपार 2.30 पर्यंत स्थगित करण्यात आलं. पण, कामकाज सुरू होताच पुन्हा वाद सुरू झाला. सलीम यांनी आपण आपल्या विधान ठाम असून राजनाथ यांनीच खुलासा करावा अशी मागणी केली. सलीम यांनी आपल्यावर गंभीर आरोप लावले आहे त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावे जर त्यांनी आरोप सिद्ध केले तर पदाचा राजीनामा देईल असं राजनाथ यांनी म्हटलं. पण तरीही सलीम आपल्या विधानावर ठाम होते. अखेर 4.15 ला संसदेच कामकाज सस्थगिती करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 30, 2015 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close