S M L

कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पायर्‍यांवरच केली आंघोळ

Sachin Salve | Updated On: Nov 30, 2015 06:55 PM IST

कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पायर्‍यांवरच केली आंघोळ

30 नोव्हेंबर : लातूर शहराला अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याच्या निषेधार्थ मुस्लिम विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पायर्‍यांवर आंघोळ करुन अनोखा निषेध व्यक्त केला.

मागील अनेक दिवसांपासून लातूर शहराला अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे, कधी पंधरा दिवसांला तर कधी वीस दिवसांला पाणी येत आहे. अनेक भागात पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत आहे यामुळे लोकांना पाण्याची कमतरता भासत आहे. लातूर महानगरपालिकेकडे या बाबत वेळोवेळी निवदने देण्यात आली आहे. मात्र, यावर कसलाच उपाय केला गेला नाही.

या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आज मुस्लिम विकास परिषदेचे कार्यकर्ते लातूर महानगरपालिकेत बकेट मग आणि साबण घेऊन दाखल झाले. मागील तीन दिवसांपासून पाणी संपले आहे. आंघोळ केली नाही, पाणी येत नाही. यांमुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा ही मागणी करत त्यांनी महानगरपालिकेच्या पायर्‍या वरच चक्क आंघोळ केली. पाणी पुरवठा जर सुरळीत झाला नाही तर रोज महापालिकेच्या आवारातच आंघोळ करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 30, 2015 06:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close